म्हणून महिलांनीच तिची केली धुलाई !

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- भर दुपारी मद्यधुंद झालेल्या चक्क एक महिलेने तब्बल दोन तास गोंधळ घातला.

यावेळी तिने अनेकांना दमदाटी व शिवीगाळ करत दुकानांमधील सामानाची तोडफोड करून पोलिसांनाही शिवीगाळ केली. ही घटना संगमनेर शहरात घडली.

शहरातील मेनरोड परिसरातील चावडी येथे असणार्‍या तलाठी कार्यालयासमोर दुपारी दोन वाजेच्या सुमारास मद्याच्या नशेत असलेली तीस वर्षे वयाची महिला अचानक अवतरली. तिने जास्त मद्य सेवन केल्याने तिचा स्वतःवरील ताबा सुटला होता.

तिने अनेकांना शिवीगाळ केली. तिने घातलेला गोंधळ समजल्याने पोलिसांचे वाहन घटनास्थळी आले. पोलिसांचे वाहन पाहताच तिने पोलिसांनाही शिवीगाळ सुरू केली. माझ्यावर कारवाई करण्यासाठी कोणत्याही अधिकार्‍याला बोलवा मी घाबरत नाही, असे म्हणत तिने पोलिसांचे वाहन अडविले.

दम असेल तर माझ्यावर कारवाई करून दाखवा असे खुले आव्हान तिने उपस्थित पोलिसांना दिले. तिचा अवतार पाहून पोलीस निघून गेले. यानंतर सदर महिलेने अशोक चौकात येऊन धिंगाणा घातला. या ठिकाणी असलेल्या विविध छोट्या दुकानातिला सामानाची तिने नासधूस केली.

काही दुकानांमधील हजारो रुपयांच्या कपबशा व इतर साहित्य तिने फोडून टाकले काही वृद्ध माणसांनाही यावेळी तिने मारहाण केली. दुकानात होत असलेले नुकसान पाहून काही महिलांनी तिची यथेच्छ धुलाई केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe