….म्हणून काँग्रेसने केले ‘जोडे मारो’आंदोलन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचे नाव बदलण्याचा प्रयत्न केल्याने या प्रकरणाची नगरमध्ये देखील तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.

शहर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली इम्पिरीयल चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, मोदी सरकार मुर्दाबाद, अदाणी उद्योगपती मुर्दाबाद, अशा घोषणाबाजी करत पंतप्रधान मोदी व उद्योगपती अदाणी यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले.

मुंबईतील सांताक्रुझ येथील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचे व्यवस्थापन जेव्हीके कंपनीकडून अदाणी कंपनीकडे आले आहे. या कंपनीने व्यवस्थापनाचा ताबा घेताच विमानतळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोरच अदाणी एअरपोर्ट असे फलक लावले होते.

हे फलक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काल उखडून टाकले. दरम्यान या घटनेचे नगर शहरात देखील तीव्र पडसाद उमटले आहेत. शहर जिल्हा कॉंग्रेसने या प्रकरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असल्याचे म्हणत

महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वोच्च स्थानी असून मोदी सरकारच्या आशीर्वादाने अदाणी उद्योगपतीने केलेला हा किळसवाणा प्रकार घृणास्पद असल्याचे म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe