अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:- नगर जिल्ह्यात संग्राम जगताप, आशुतोष काळे हे तरुण आमदार आहेत. वैभव पिचड आणि राहुल जगताप हेही होते. वैभव पिचड यांना समजून सांगितले; परंतु त्यांचा निर्णय त्यांनी घेतला. राहुल जगताप यांनीही उमेदवारी करणार नसल्याचे जरा लवकर सांगितले.
असते तर आज घनशाम शेलार हे आमदार असते. अन श्रीगोंदा तालुक्यातील चित्र देखील वेगळे असते. असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर यांच्या मुंबई येथे मंगळवारी झालेल्या प्रवेश सोहळा पार पडला .
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदामंत्री जयंत पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार किरण लहामटे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके सहभागी आदी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर जिल्हा बँक व तसेच विविध विषयांवर भाष्य केले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
- #Former Union Minister Dilip Gandhi dies