अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये वृद्धांना कोरोनाने घेरले होते. दुसऱ्या लाटेत कोरोनाचे नियम न पाळल्याने तरुणांना घेरले.
आता संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना त्रास होऊ शकतो, असे शासन व जागतिक आरोग्य संघटनेचे मत असून त्याचे प्रमाण मात्र कमी असणार आहे.

योग्य ती खबरदारी व काळजी घेतली तर लहान मुलांच्या कोरोना संसर्ग बाबतीतील धोका टळू शकतो, असे प्रतिपादन संगमनेर येथील बालरोगतज्ञ डॉ. राजेंद्र खताळ यांनी अकोल्यात केले.
येथील अभिनव शिक्षण संस्था व अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाल युवा प्रबोधन वेबिनॉरमध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी अकोले येथील बालरोगतज्ञ डॉ. संदेश भांगरे व डॉ. दर्शन बंगाळ यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकर नवले, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जे. डी. आंबरे, कार्यकारिणी सदस्य आरीफ तांबोळी आदींसह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पालकांच्या विचारलेल्या प्रश्नांचे समाधान डॉक्टरांनी केले. यावेळी डॉ. खताळ यांनी पालकांनी ६ महिने ते १८ वर्षापर्यंतच्या मुलांना पावसाळी आजार व कोरोना एकत्रित झाले,
तर त्या सर्वांचे उपचार करणे अवघड होऊ शकते म्हणून कोरोनाव्यतिरिक्त पावसाळी आजाराच्या अनुषंगाने असलेल्या सर्व लसीकरण डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घ्यावेत, असे आवाहन केले.
यावेळी डॉ. दर्शन बंगाळ म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरे यांनी बालरोगतज्ञ यांच्याशी वेबिनॉरद्वारे संवाद साधला. तिसरी लाट लहान मुलांना बाधित होऊ शकते म्हणून संतुलित आहार देण्यात यावा.
त्यामध्ये कार्बोहायड्रेसचे प्रमाण वाढवण्यासाठी व प्रोटिन्स मिळण्यासाठी पालेभाज्या, अंडी, चिकन, मासे, खजूर, कडधान्ये, डाळी, चपाती, बटाटे, दूध व दुग्धजन्य पदार्थ, पाण्याचे प्रमाण वाढवावेत, असा सल्ला दिला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम