अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- केवळ स्वत:च्या ज्ञाती समाजापुरते संतांचे कार्य नसते तर समानता आणि समाजसेवेला ते महत्व देतात. यात राष्ट्र संत भगवान बाबांसारख्या थोर विभुतींचा समावेश असून, त्यांच्या विचाराचा समाजाने पुरस्कार करुन आचरण करावे, असे मत नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रसंत भगवान बाबा जयंतीनिमित्त मंगलगेट येथे त्यांच्या प्रतिमेला माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेवक बाळासाहेब बोराटे प्रमुख आतिथी म्हणून बोलत होते. या जयंती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ओबीसी, व्हीजे-एनटी जनमोर्चा नगर जिल्हा शाखेचे अध्यक्ष व माजी नगरसेवक सुनिल भिंगार होते.
संत भगवान बाबांचा आदर्श समाजाने घ्यावा, असेच त्यांचे जीवनचरित्र आणि विचार असून, ते समाजावून घेण्यासाठी असे उत्सव समाजात होत असतात, असे अध्यक्षीय भाषणात अध्यक्ष श्री.भिंगारे यांनी सांगितले तर संत, थोर विभुतींची शिकवणीतून समाजाला सत्याचा आणि सेवेची महंती समजते यातून समाजाचे परिवर्तन होते, असे माजी महापौर श्री.फुलसौंदर यांनी सांगितले.
समाजात समानता रुजविण्याचे कार्य भगवान बाबासारख्या अनेक महान व्यक्तींनी केले आहे, असे आरपीआयचे सुनिल क्षेत्रे यांनी सांगितले. स्वागत-प्रास्ताविक जनमोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी केले. सरचिटणीस व भगवान बाबा महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सानप, माजी नगरसेवक अशोक दहिफळे,
फिरोज खान, कॅन्टों.बोर्डाचे माजी सदस्य नामदेव लंगोटे आदिंची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमास बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल इवळे, शहराध्यक्ष शामराव औटी, हर्षल म्हस्के, परेश लोखंडे, शशिकांत पवार, बंटी डापसे, संजय सागावकर आदि उपस्थित होते. शेवटी नईम शेख यांनी आभार मानले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम