अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या बेताल वक्तव्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे चांगलेच अडचणीत सापडले आहे. सोमवारी राज्यभर राणेंच्या विरोधात आंदोलने करण्यात आले.
याचेच पडसाद नगर जिल्ह्यात देखील ठिकठिकाणी उमटले होते. वादग्रस्त वक्तव्य करून राज्यातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करणार्या विरुद्ध कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.
खरे तर उंचीपेक्षा जास्त मोठे पद मिळले तर काहीजण हवेत तरंगतात. कुणी कोणत्याही पक्षाचे काम करा पण नाहक एकमेकांतील वैरभाव वाढवून राज्यातील राजकारण कलुषित करू नये.
अशा शब्दात कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी नारायण राणेंच्या वक्तव्याचा निषेध केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बेताल वक्तव्य करून संपूर्ण महाराष्ट्राचा अवमान केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकारी मंत्र्यांना जनसंपर्क यात्रा काढण्याच्या सूचना दिल्या. केंद्र शासनाच्या योजना, धोरणे याबाबत जनजागृती करायला सांगितले.
पण ना. राणे यांनी कुठलेही भान न ठेवता मुख्यमंत्री पदाचा अवमान तर केलाच पण भाजपालाही मान खाली घालायला लावली आहे. असेही वहाडणे म्हणाले.
बाहेरून आणून पक्षाच्या मानगुटीवर बसविलेल्या नेत्यांवर भाजपाचे नियंत्रण राहू शकत नाही. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी मोदी चोर है असे तारे तोडले होते. त्याचाही निषेध कानाखाली मारण्याची भाषा करून फार लोकप्रियता मिळेल या भ्रमात राणे यांनी राहू नये.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम