अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :- अंगातील भूत काढून देतो, असे सांगून एका भोंदूबाबाने विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना तालुक्यातील पारेगाव येथे २३ एप्रिल रोजी घडली.
अत्याचारित विवाहितेने संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने या भोंदूबाबा विरुद्ध सोमवारी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
सावित्रा बाबुराव गडाख (वय ५५) असे भोंदुबाबा आरोपीचे नाव आहे. सिन्नर तालुक्यातील मानोरी येथील ४५ वर्षीय महिलेला अनेक शारीरिक व्याधी होत्या. उपचार करूनही तिला बरे वाटत नव्हते.
संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रूक येथे राहणाऱ्या तिच्या भावाने नात्यातील सावित्रा बाबुराव गडाख या भोंदूबाबाकडे उपचारासाठी नेले होते.
भोंदू बाबा हा मंत्र टाकून लिंबू देऊन लोकांना बरे करतो तसेच त्याचे अंगात हवा येते. यावर विश्वास ठेवून महिलेने आपला त्रास सावित्रा गडाखला सांगितला. त्यावर त्याने ताईत दिला होता. तुझ्या अंगात भूत बाधा झाली, ती काढावी लागेल, असे त्याने सांगितले.
त्यानुसार आपल्या पतीला बरोबर घेऊन भोंदूबाबाकडे गेली व तिला जबरदस्तीने मद्य पाजून शेतात नेऊन अत्याचार करण्यात आला. विवाहित महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पतीला काही दिवसांनी अत्याचाराबाबत सांगितले.
सोमवारी या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली. संगमनेर तालुका पोलिस स्टेशनला महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायद्या अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस अॅड. रंजना गवांदे यांनी तालुका पोलिसांशी संपर्क साधून या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली. कडक कारवाईची मागणी केली.
या संदर्भात तालुका पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. या प्रकरणावरून संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणातील आरोपीला अटक केलेली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|