शिक्षिकेने 13 वर्षाच्या मुलासोबत बळजबरीने केले असे काही…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- शिक्षक विद्यार्थ्यांच्या नात्याला काळिमा फासणारी एका घटना जालंधर येथे घडली आहे. आपल्या राशीतील मंगल सुरू व्हावा व आपले लग्न जुळावे यासाठी चक्क एका शिक्षिकेने आपल्याच 13 वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत जबरदस्ती लग्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

दरम्यान अल्पवयीन विद्यार्थ्याच्या परिवाराकडून शिक्षिकेविरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. याबाबात अधिक माहिती अशी कि, शिक्षिकेने विद्यार्थ्याला ट्यूशनचं आमिष देत दिवस आपल्या घरात रोखून धरलं आणि लग्न केलं.

मात्र, हे लग्न केवळ प्रतिकात्मक होतं. शिक्षिकेने विद्यार्थ्याला ६ दिवस जबरदस्ती घरात थांबवून ठेवलं आणि जबरदस्ती त्याच्यासोबत लग्न केलं. हळद-मेहंदी आणि मधुचंद्र याचंही नाटक करण्यात आलं.

यानंतर पंडितच्या सांगण्यावरून बांगड्या तोडून विधवा होण्याचंही नाटक या शिक्षिकेने केलं. इतकेच नाही तर शोकसभाही आयोजित करण्यात आली होती.

लग्नाचे रितीरिवाज पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्याला घरी पाठवण्यात आलं. मुलाच्या घरच्यांचा आरोप आहे की, त्याच्याकडून शिक्षिकेने आणि तिच्या परिवारातील लोकांनी घरातील कामेही करून घेतली.

घरी परतल्यावर त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला. हे समजल्यावर मुलाच्या घरचे लोक भडकले आणि त्यांनी पोलिसात जाऊन तक्रार दिली.

याप्रकरणी जालंधऱचे डीएसपी गुरमीत सिंह यांनी मान्य केलं की, अशाप्रकारचं लग्न झालं आहे आणि याची माहिती पोलिसांना आहे. ते म्हणाले की, घटनेची चौकशी केली जात आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe