मुलीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग आल्याने जावयासोबत केले असे काही…वाचा अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक बातमी !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- मुलीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग येऊन पाथर्डीच्या माणिकराव खेडकर यांनी आपल्या नातेवाईकांसह येऊन आंतरजातीय विवाह केलेल्या आपल्या जावयास त्याच्या घरासमोर जिवे मारण्याचा प्रयत्न केला. नेवासे येथील बंटी ऊर्फ प्रशांत राजेंद्र वाघ याचे व पाथर्डीतील माणिक खेडकर यांच्या मुलीसोबत एक मार्च रोजी आंतरजातीय विवाह झाला.

या विवाहाला मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. शनिवारी दुपारी नेवासे पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावरील कडू गल्ली येथे वाघच्या घरासमोर तीन-चार चारचाकी वाहने आली. एका गाडीतून मुलीचे वडील माणिक खेडकर, भाऊ ऋषिकेश खेडकर व एक अनोळखी उतरले.

दरवाज्यात उभ्या असलेल्या प्रशांतला हत्याराचा वार केला. परंतु मध्ये मोटारसायकल असल्याने वार चुकला. त्यामुळे प्रशांत जिवाच्या आकांताने ओरडत घरात पळाला. यावेळी मुलीच्या भावाने त्याचेकडे पिस्तुल रोखले. इतर गाड्यातून आलेल्या व्यक्तीच्या हातात चाकू, रॉड, एअर गन होते. यावेळी याला मारा, सोडू नका, असे माणिकराव खेडकर ओरडून सांगत होते.

प्रशांतच्या ओरडण्याने गल्लीतील लोक जमा झाले. हे पाहून आरोपी आपापल्या गाड्यांत बसून नेवासेफाट्याच्या दिशेने पळाले. प्रशांतने पोलिस स्टेशनला फोन करून माहिती दिली. पोलिसांनी तत्परता दाखवून भानस हिवरा रोडवर हॉटेल सावताजवळ आरोपींना पकडले.

पोलिसांनी तीन गाड्यांसह सात जणांना ताब्यात घेतले. परंतु माणिक कोंडिबा खेडकर, ऋषिकेश खेडकर व त्यांचा भाऊ हे वेगळ्या वाहनाने फरार झाले, अशी फिर्याद प्रशांत वाघ याने नेवासे पोलिसात दिली. सध्या सात जणांविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आर्म अॅक्ट दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक विजय करे करीत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe