अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :-कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीम वेगाने सुरु आहे. मात्र काही दिवसांपासून लसीकरणाचा तुटवडा जाणवू लागल्याने या मोहिमेला अनेकदा खीळ बसली होती.
मात्र आता यातच केंद्राकडून एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. देशात कोरोना लसीकरण मोहिमेसाठी जून महिन्यात सुमारे १२ कोटी कोरोना लसीचे डोस उपलब्ध होतील,
अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्र्यालयाने दिली आहे. यामुळे पुन्हा एकदा देशात कोरोना लसीकरणाची मोहीम वेग पकडणार आहे.
यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होणार आहे. देशात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहीम १ मे पासून सुरु झाली आहे.
शुक्रवारपर्यंत देशात २०.८६ कोटी करोना लशींचे डोस दिले गेले आहेत.राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात अजूनही १.८२ कोटी लशींचे डोस उपलब्ध असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली होती.
तसेच पुढच्या तीन दिवसात ४ लाखांहून अधिक डोस मिळतील असं सांगण्यात आलं आहे.दरम्यान जून महिन्यात सुमारे १२ कोटी कोरोना लसीचे डोस उपलब्ध होतील.
त्यापैकी सुमारे ६ कोटी ९ लाख डोस केंद्र सरकार विनामूल्य वाटप करणार आहे. तर ५ कोटी ८६ लाख पेक्षा जास्त डोस राज्य सरकार,
केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांद्वारे थेट खरेदीसाठी उपलब्ध असतील. मे महिन्यात सुमारे ८ कोटी कोरोना लस डोस उपलब्ध होते. या लसींच्या वाटपाचे वेळापत्रक राज्यांना शेअर केले जाईल.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयामार्फत राज्यांना सूचना देण्यात आल्या आहेत की, संबंधित अधिकाऱ्यांना वाटप केलेल्या डोसचा तर्कसंगत आणि न्याय वापर सुनिश्चित करावा आणि लसीचा अपव्यय कमी करावा.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम