घरातून १५ कोटी खर्च केला, प्रत्येक वेळी पैसे कुठून आणू?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यास मी कटिबद्ध आहे. मात्र, संचालक मंडळाला राज्य सरकारने एक वर्षाची मुदतवाढ दिल्यास मी कारखाना चालविण्यास तयार असल्याचा पुनरूच्चार नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी केला.

राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे डॉ. तनपुरे कारखान्याबाबत खा. डॉ. विखे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होतेे. डॉ. तनपुरे कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत दि. 26 जून 2021 रोजी संपलेली आहे. या संचालक मंडळाला दि. 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

कारखान्याच्या गळीत हंगाम ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरू होतो. कारखाना सुरू करण्यासाठी किमान 10 कोटी रुपये खर्च येतो. सध्या कोणतीही बँक कारखान्याला एकही रुपया कर्ज देत नसून आतापर्यंत कारखाना सुरू करण्यासाठी मी वैयक्तीक घरातून 15 कोटी रुपये खर्च केला आहे.

प्रत्येकवेळेस कारखाना सुरू करण्यासाठी पैसे आणायचे कोठून? असा सवाल त्यांनी केला. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले , ज्येष्ठ नेते अ‍ॅड. सुभाष पाटील, कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे,

उपाध्यक्ष दत्तात्रय ढूस, माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील, शामराव निमसे, सुरसिंग पवार, बाळकृष्ण कोळसे, महेश पाटील, रवींद्र म्हसे, उत्तम आढाव, शिवाजी सयाजी गाडे, पंकज चौधरी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe