एसटी संप ! नगर जिल्ह्यातील ‘एवढे’ कर्मचारी झाले निलंबित

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर – गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर गेले आहे. यामुळे लालपरीची चाके पूर्णतः थांबली असून यामुळे प्रवाश्यांचे मोठे हाल होत आहे. यातच एसटी कर्मचार्‍यांच्या संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाहीये.

दरम्यान आता या प्रकरणी एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असून संप मागे घेण्याच्या तयारीत नाहीयेत. राज्य सरकारकडून एसटी कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात येत असतानाही संप सुरूच आहे. यातच नगर जिल्ह्यातील 20 कर्मचाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे.

राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावं यासाठी एसटी कर्मचार्‍यांनी संप पुकारला आहे. मात्र कायद्याने हे शक्य नसल्याचं राज्य सरकारचं म्हणणं आहे.

यासाठी त्यांनी कर्मचार्‍यांकडे काही अवधीही मागितला आहे. मात्र एसटी कर्मचारी मागे हटायला तयार नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे राज्य सरकारने कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान पुण्यातून 138 कर्मचार्‍यांचा निलंबन करण्यात आलं असून त्यानंतर ठाण्यातून 73, नाशिकमधून 54 कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आलं आहे. नगर जिल्ह्यातील 20 कर्मचार्‍यांनाही निलंबित करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe