व्यवसाय सुरू करायचा तर त्यासाठी पैसा लागतो व तो पैसा म्हणजेच भांडवल हे व्यवसायाचे स्वरूप म्हणजे तुम्ही व्यवसाय मोठ्या स्वरूपात सुरू करणार आहात का छोट्या प्रमाणामध्ये यावर अवलंबून असते. तसेच तुम्ही कोणता व्यवसाय सुरू करणार यावर देखील लागणारा पैसा अवलंबून असतो.
व्यवसाय सुरू करताना कमीत कमी खर्चामध्ये आणि जास्तीत जास्त नफा देऊ शकेल असा व्यवसाय निवडणे खूप गरजेचे असते व असे कमी भांडवलात सुरू करता येणाऱ्या व्यवसायाची यादी खूप मोठी आहे.
त्यामुळे या लेखामध्ये आपण कमी भांडवलात सुरू करता येणारा व चांगल्या प्रकारे नफा मिळवून अशा एका व्यवसायाची माहिती या लेखात बघणार आहोत. जी नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी नक्कीच फायद्याचे ठरेल.
कपड्यांचा व्यवसाय ठरेल तुमच्यासाठी गेमचेंजर
कपड्यांचा व्यवसाय हा फायदेशीर आणि लोकप्रिय असा व्यवसाय असून सुरुवातीच्या अगदी 25 ते 30 हजार रुपये भांडवलात तुम्ही या व्यवसायाला सुरुवात करू शकतात व मर्यादित बजेटमध्ये सुरुवात करून महिन्याला 60 ते 70 हजार रुपये कमावणे या माध्यमातून शक्य आहे.
हा व्यवसाय सुरू करण्याआधी तुम्हाला योग्य ठिकाण आणि बाजारपेठे यांची माहिती असणे आवश्यक आहे. तुम्ही व्यवसाय सुरू करण्याअगोदर तुमच्या भोवतालच्या स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करणे गरजेचे आहे व यामध्ये कोणत्या कपड्यांना सर्वाधिक मागणी आहे ते देखील पहावे.
सध्या मोठ्या प्रमाणावर फॅशनचे युग असून फॅशन इंडस्ट्री सतत बदलत असते व त्यामुळे कोणत्या क्षणी कोणत्या प्रकारचे ट्रेंड चालत आहेत याचा देखील अभ्यास करणे गरजेचे आहे. तसेच आजकाल कोणत्या प्रकारचे कपडे सर्वात जास्त विकले जातात हे जर तुम्हाला समजून घ्यायचे असेल तर तुम्ही फ्लिपकार्ट ॲमेझॉन सारख्या प्लॅटफॉर्मवर जाऊन याबाबतचे रिसर्च करू शकतात.
कोणत्या प्रकारच्या कपड्यांचा व्यवसाय सुरू कराल?
कपड्यांच्या व्यवसायामध्ये अनेक पर्याय उपलब्ध असून यामध्ये महिला, पुरुष, लहान मुलांसाठी योग्य असलेले तयार कपडे तुम्ही विकू शकतात किंवा मोठ्या प्रमाणात कपडे खरेदी करणे आणि किरकोळ विक्री करणे या माध्यमातून आपल्याला चांगला नफा मिळतो.
तसेच तुम्ही या व्यवसायात मिळालेल्या ऑर्डरवर देखील काम करू शकतात व यामध्ये तुम्हाला विशेष डिझाईन्स स्टिच केल्या जातील व त्या ग्राहकांना तुम्ही उपलब्ध करून द्याल. सण आणि लग्नाच्या समारंभात एथनिक कपड्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर असते व तुम्ही याला तुमच्या व्यवसायाचा एक भाग बनवू शकतात.
स्वस्त कपडे कुठे खरेदी कराल?
तुम्हाला जर व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वस्त आणि दर्जेदार कपडे खरेदी करायचे असतील तर याकरिता घाऊक बाजार हा एक उत्तम पर्याय आहे. उदाहरण घ्यायचे झाले तर दिल्लीचे गांधी मार्केट तसेच मुंबईचे धारावी मार्केट, सुरत किंवा अहमदाबादचा कापड बाजार या स्वस्त कपड्यांच्या खरेदीसाठी प्रसिद्ध आहेत.
याव्यतिरिक्त तुम्ही उडान, इंडिया मार्ट आणि मेशो सारख्या ऑनलाईन वेबसाईटचा वापर करू शकतात व या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला तुमच्या बजेटला अनुकूल असे अनेक पर्याय मिळतात.
किती येईल खर्च?
सुरुवातीच्या खर्चाबद्दल जर आपण बघितले तर तुम्हाला कपडे खरेदी करण्यासाठी सुमारे 15 हजार रुपयांचा खर्च करावा लागेल. रॅक आणि डिस्प्ले सारख्या इतर गोष्टींसाठी सात हजार रुपये आणि पॅकेजिंगची किंमत 3000 रुपये असेल.
तसेच मार्केटिंगकडे लक्ष देत असाल तर त्यासाठी 5000 चा बजेट तुम्हाला ठेवावाच लागेल. अशाप्रकारे तुम्ही तुमचा व्यवसाय 25 ते 30 हजाराच्या आतमध्ये सुरू करू शकतात.
किती नफा मिळू शकतो?
जर तुम्ही प्रत्येक महिन्याला 60 ते 70 हजार रुपयांची विक्री केली आणि 30 ते 40 टक्के नफा ठेवला तर तुमची प्रत्येक महिन्याला कमाई वीस ते तीस हजार रुपये सहजपणे होऊ शकते.
जसजसा तुमचा अनुभव यामध्ये वाढेल व तुमच्याविषयी ग्राहकांमध्ये जर विश्वास वाढला तर तसतसे तुमची कमाई देखील वाढत जाते.
व्यवसायाची वाढ कशी कराल?
मार्केटिंग आणि प्रमोशनकडे तुम्हाला लक्ष देणे गरजेचे राहील व त्यामुळे तुमचा व्यवसाय यशस्वी होईल. इंस्टाग्राम आणि फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर तुम्ही तुमच्या उत्पादनांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करू शकतात.
तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हाट्सअप बिजनेसचा वापर करून तुम्ही चांगले परिणाम मार्केटिंगच्या बाबतीत मिळवू शकतात व सुरुवातीला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी छोट्या ऑफर आणि सूट द्या.
तसेच ऑनलाईन प्लॅटफॉर्म वापरून तुमची विक्री वाढवण्यावर भर द्या. याकरिता तुम्ही ॲमेझॉन तसेच फ्लिपकार्ट आणि मिंत्रा वर तुमचे स्टोअर उघडा व इंस्टाग्राम आणि फेसबुक वर शॉप वैशिष्ट्ये वापरा. तुमचा बजेट व्यवस्थित असेल तर तुम्ही स्वतःची वेबसाईट तयार करा व जेणेकरून तुम्हाला ग्राहकांशी थेट कनेक्ट होता येईल.