राज्य उत्पादन शुल्क विभागाची ‘मोठी’ कारवाई तब्बल ९५ लाखांचा मुद्देमाल घेतला ताब्यात

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात व्रिकीस प्रतिबंध असलेला मोठा अवैध मद्यसाठा घेऊन जाणारी मालवाहतूक गाडी नगर राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडली.

या कारवाईत एकूण ९४ लाख ८८ हजार रुपयांच्या अवैध दारु साठ्यासह इतर मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी गुडू देवीसिंग भिल (मध्यप्रदेश) या वाहनचालकाला ताब्यात घेतले आहे.

ही कारवाई राहाता तालुक्यात नगर-मनमाड रोडवरील अस्तगाव फाटा येथे केली. याबाबत सविस्तर माहिती अशी की,

नगर राज्य उत्पादन शुल्क विभागास राहाता तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार मागील तीन ते चार दिवसापासून विशेष पथके या कामगिरीवर होते.

त्यानुसार दि.२७ रोजी सकाळी मिळालेल्या महितीवरुन नगर-मनमाड रोडवर अस्तगाव फाटा येथे (क्र.एम.एच १८ बी.जी.५२७४) या क्रमांकाचा आयशर प्रो कंपनीच्या सहाचाकी ट्रकची पथकाने तपासणी केली असता

ट्रकमध्ये गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्रात व्रिकीस प्रतिबंध असलेल्या तब्बल९४ लाख ८८ हजार रुपये किंमतीचा दारुसाठा आढळून आला.

या प्रकरणी दारुबंदी गुन्हा अन्वेषन शाखेत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यावेळी वाहनचालक गुडू देवीसिंग भिल यास अटक करण्यात आली.

याकारवाईत एकूण ९४ लाख ८८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्यात आंतरराज्यात टोळी सक्रीय असण्याची शक्यता असून इतर आरोपींचा शोध घेण्यात सुरू आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe