महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे विधान आणि राजकीय वर्तुळात…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार की स्वबळावर, या मुद्द्यावर काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरातयांनी आपली भूमिका मांडली आहे.

शक्य होईल तितक्या निवडणुका आम्ही एकत्रित लढणार आहोत, असे थोरात यांनी म्हटले आहे. थोरात यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. आघाडीतील तिन्ही पक्षांना आपापले पक्ष वाढवण्याची गरज आहे. प्रत्येकाला तो अधिकार आहे. त्या दृष्टीने आम्ही काम करतही असतो. यात काही चुकीचे आहे असे वाटत नाही.

शिवसेने स्वबळाचा नारा दिला आहे असे मला कुठेही दिसत नाही, असे सांगतानाच शक्य होईल तितक्या निवडणुका आम्ही एकत्रित लढणार आहोत, असे थोरात यांनी स्पष्ट केले आहे.

विधानसभा अध्यक्षपदाबाबत सुरू असलेल्या चर्चेवर देखील त्यांनी भाष्य केले. शिवसेनेने विधानसभेच्या अध्यक्षपदावर दावा केलेला नाही. त्यामुळे विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसचाच उमेदवार असणार आहे, असे थोरात यांनी स्पष्ट केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe