अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :- मे महिन्यात मोठ्याप्रमाणात होणाऱ्या लसीकरणाच्या पाश्वर्भूमीवर शहर भाजपच्या वतीने मनापा आयुक्त शंकरराव गोरे यांना निवेदन दिले आहे.
शहरातील लसीकरण केंद्रांवर गर्दी होवू नये, सर्वांना लस मिळावी, शासनाच्या नियमनाचे पालन व्हावे यासाठी भाजपच्या वतीने आयुक्तांना काही उपाययोजनांंचे निवेदन दिले आहे.
मनपा आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, मे महिन्यात मोठ्यासंख्येने लसीकरण होणार आहे.
त्यामुळे महापालीकडून नगर शहरातील नागरिकांचे पहिले व दुसरे लसीकरणाचे व्यवस्थित नियोजन व्हावे यासाठी शहर भारतीय जनता पार्टीच्या काही उपाययोजना सुचवण्यात येत आहेत.
मतदान केंद्रानिहाय लसीकरण केंद्रांची निर्मिती करावी, केंद्राच्या कार्यक्षेत्रातील बुथनिहाय कुटुंबांचे सर्वेक्षण करावे, लसीकरण मोहिमेत ६० वर्षे वयाच्या नागरिकांना प्राधान्य देण्यात यावे, लसीकरणाचा डेटा दर्शविणारे पुणे मनपाच्या धर्तीवर पोर्टल / डॅशबोर्डच्या तातडीने विकसित करावा.
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या महाविद्यालयाच्या ठिकाणी लसीकरण कार्यक्रम जाहीर करवा. सेंटर निहाय उपलब्ध लसींची संख्या एक दिवस आधी जाहीर करावी व त्यानुसार टोकन वितरण करावे.
जेणेकरून केंद्रावर गर्दी होणार नाही तसेच राज्य सरकारकडे नगर शहरासाठी आवश्यक लशींची आगाऊ मागणी करावी.
लसीकरणाला गती देण्यासाठी अहमदनगर मनपाने आयएमए शी संलग्न खाजगी डॉक्टर, वैद्यकीय व नर्सिग महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य घ्यावे.
नागरिकांमध्ये लसीकरणा बाबत जनजागृती, सर्वेक्षण, लसीकरण केंद्रावर स्वयंसेवक अशी सर्व मदत करण्यास भाजपचे कार्यकर्ते सहकार्य करतील.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|