अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने पालकमंत्र्यांना निवेदन

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- महाराष्ट्रातील 20 लाख ऑटो रिक्षा परवाना धारकांसाठी 2014 साली कल्याणकारी मंडळाचा अहवाल सरकारने स्वीकारला होता त्याची अंमलबजावणी सरकारने करावी या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले

यावेळी आमदार संग्राम जगताप समवेत संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले, गोरख खांदवे, लतीफ शेख, विजय शेलार, प्रमुख सल्लागार विलास कराळे आदि उपस्थित होते. महाराष्ट्रातील 20 लाख परवानाधारक ऑटो रिक्षा चालक मालक यांच्यासाठी 2014 रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑटो रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना केली होती

अभ्यास गट स्थापन करून त्यांचा अहवाल स्वीकारला होता पण आजपर्यंत सरकारने ऑटो रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळाचे कामकाज चालू केलेले नाही आज आठ वर्ष होत आलेले आहे पण सरकार त्यावर विचार करायला तयार नाही त्यामुळे ऑटो रिक्षा चालक हा कष्टकरी असून

आज पेट्रोल डिझेल गॅस व इतर जीवनावश्यक वस्तूचे भाव फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे त्यांना त्यांचे कुटुंब चालवणे अवघड झाले आहेत जर शासनाने ऑटो रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळाचे काम चालू केले तर रिक्षाचालकांच्या कुटुंबियांना काही प्रमाणात सरकारी योजनेचा लाभ देखील मिळणार

तरी सरकारने लवकरात लवकर ऑटो रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळाचे कामकाज लवकरात लवकर चालू करावे या मागणीचे अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदन दिले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe