अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-नगर- सोलापूर महामार्गावर सोलापुरच्या दिशेने जाणाऱ्या कापसाच्या ट्रकने अचानक पेट घेतला.
व बघता बघता अख्खा ट्रक आगीत कापसासह जळून खाक झाला आहे. दरम्यान या आगीत 17 लाख 75 हजारांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, कापसाने भरलेला हा ट्रक नगर- सोलापूर महामार्गावर सोलापुरच्या दिशेने चालला होता.
दरम्यान निमगाव डाकू गावाजवळ आला असता या ट्रकने अचानक पेट घेतला. आग एवढी मोठी होती की, अग्निशामक बंब गाडीतील पाणी संपले तरी आग आटोक्यात आली नव्हती.
पोलीस आणि कर्जत नगरपंचायतच्या अग्नीशामक बंबाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान या घटनेत ट्रकमध्ये असलेला सात लाख 75 हजार रुपये किंमतीचा सुमारे साडे पंधरा टन कापूस व ट्रक असा सुमारे 17 लाख 75 हजाराचा ऐवज जळून खाक झाला.
महामार्ग असल्याने बराच काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येत ठप्प झालेली वाहतूक सुरू केली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|