अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:- संगमनेर तालुक्यातील आश्वी परिसरातील अवैध धंदे त्वरीत बंद करण्यात याव्या या मागणीसाठी रिपब्लिकन पक्ष (आठवले) व एकलव्य संघटनेच्यावतीने आश्वी पोलिस स्टेशनसमोर मोर्चा काढण्यात आला.
आंदोलकांनी आश्वी पोलिस स्टेशनला 3 एप्रिलपर्यंत परिसरातील अवैध धंदे बंद करण्याचे अल्टीमेट देण्यात आला. यावेळी पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, शिर्डी विधानसभा मतदार संघातील 28 गावासह इतर गावात मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरु असून या अवैध वाम मार्गाने होणार्या धंद्यांमुळे मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी जात आहे.
या गोष्टीला आळा घालण्यासाठी पोलिस यंत्रणाही पाऊल उचलताना दिसत नसून पोलिस स्टेशन पासून हक्केच्या अंतरावर होणारे मटका, जुगार, गुटखा विक्री होताना दिसत असतानाही पोलिस यंत्रणा गप्प का? अशी शंका लोकांमध्ये निर्माण होताना दिसत आहे.
आश्वी व परिसरात वाळू तस्करी, मटका, जुगार, गुटखे आदि माध्यमातून सर्रास अवैध धंद्यांचा सुळसळाट असल्याने पोलिसांनी यावर त्वरीत बंदी आणावी याकरिता आश्वी पोलिस स्टेशनवर धडक मोर्चा नेण्यात आला. तसेच पोलिसांना १० दिवसांचा अल्टीमेट देण्यात आला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|