अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-कोरोनाग्रस्तांची वाढणारी संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहेत. त्यासाठी पुणे शहरात कडक निर्बंध जाहीर केले.
याचा फायदा झाला आहे. पुण्यातील कोरोना बाधितांचा पॉझिटिव्हीटी रेट ३६ टक्क्यांवरुन २० टक्क्यांवर आला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. सौरभ राव यांनी दिली.
मात्र पुणेकरांना आणखी सतर्कतेने कोरोना नियमावलीचे पालन करणे बंधनकारक ठरणार आहे. पुण्यात फेब्रुवारी महिन्यापासून सातत्याने कोरोना रुग्णांची वेगाने वाढ होत आहे.
मार्च महिन्यात तर हा वेग नवीन विक्रम प्रस्थापित करणारा ठरला आहे. या महिन्यात पुणे शहरात जवळपास ७० हजार रुग्ण सापडले आहे.
त्यामुळे साहजिकच प्रशासन यंत्रणांसह पुणेकरांच्या चिंतेत देखील भर पडली होती होती. विभागीय आयुक्त डॉ. सौरभ राव म्हणाले, पुण्यातील लसीकरणाचा वेग सर्वाधिक आहे.
आत्ता १ लाख लोकांना लसी देण्याची मागणी आहे. रविवारी १ लाख लस मिळणार आहे. तसेच सोमवारी पुन्हा १ लाख लसीकरणाची मागणी करण्यात आली आहे.
टेस्टींग ट्रॅकिंगही महत्वाचे आहे. दरदिवशी जवळपास ३१००० टेस्ट असून पॉझिटिव्हीची २० टक्क्यांच्या आसपास यायला सुरुवात झाली आहे.
अर्थात अजून कन्क्लुजनला येण्याची वेळ नाही. रेमडेसिव्हीर इंजेक्शनची मेडिकलमधून होणारी विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रुग्णालयानेच आता इंजेक्शन देण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात आता थेट रुग्णालयातून रुग्णाला हा पुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.राव यांनी दिली आहे.
शासकीय रुग्णालयात जर दोन रेमडेसिव्हिर वापरले जात असेल तर खासगीमध्ये त्याचे प्रमाण १००% असल्याचे पाहायला मिळत आहे.
मुळात जर रुग्णालयात एखादा माणूस ॲडमिट आहे तर त्याला तिथूनच इंजेक्शन पुरवले गेले पाहिजे.
त्यामुळे हे निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्यात आला आहे”. रेमडेसिव्हीरच्या मागणी आणि पुरवठा याच्यात तफावत आहे.
शासकीयमध्ये दर दोन पेशंट मागे एक रेमडेसिव्हिर तर प्रायव्हेटमध्ये मात्र १००% वापर केला जात आहे. त्यांच्या ट्रीटमेंट प्रोटोकॉलवर प्रश्न नाही, असेही विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|