अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:- शाळेतील विद्यार्थिनी करोना पॉझिटीव्ह आढळून आल्याने शाळा आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार श्रीरामपूर तालक्यातील मालुंजा येथील एका शाळेत घडला आहे.
तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ग्रामस्थांनी आठवडे बाजार बंद करण्यात निर्णय घेतला आहे. सविस्तर माहिती अशी कि, मालुंजा येथील एका शाळेतील विद्यार्थिनीचे आजोबा नगर येथील एका रुग्णालयात करोना पॉझिटीव्ह म्हणून उपचार घेत आहेत.
त्यामुळे तिच्या कुटुंबियांच्या संपर्कात आल्याने तिची तपासणी करण्यात आली असता तिचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. शाळेने तातडीने बैठक घेऊन शाळा आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तिची तपासणी करण्यात आली त्यावेळी शाळा बंद होती. शाळेत नेहमी सॅनिटायर, थर्मलचा वापर करुन सोशल डिस्टन्सचा वापर करण्यात येत असतो.
त्यामुळे अन्य कोणाला करोनाची भिती नाही. तरीही पालकांचे संमतीपत्र घेऊन विदयार्थ्यांची करोना तपासणी करण्यात येणार असल्याची माहितीही दिवे यांनी दिली.
ग्रामस्थांनी याबाबत बैठक घेऊन आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून गावात योग्य ती खबरदारी घेत ग्रामस्थांनी करोनाबाबतचे सर्व नियम पाळावेेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|