अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- मागील पाच महिन्यांपासून जिल्ह्यातील विद्यार्थी शालेय पोषण आहारापासुन वंचित आहेत.
याच्या निषेधार्थ शिक्षणाधिकारी प्राथमिक शिवाजी शिंदे यांना जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाकचौरे, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव खेडकर, सोमीनाथ पाचारणे आदींनी पोषण आहार देवून गांधीगीरी केली.
यावेळी गटनेते जालिंदर वाकचौरे म्हणाले की, अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे जिल्ह्यातील पाच महिन्यापासून विध्यार्थी पोषणआहारापासून वंचित आहेत.
खरंतर कोरोनाच्या काळात आठ नऊ महिने शाळा बंद होत्या त्या काळात पोषण आहार वाटला असं कागदावर दिसते, परंतु प्रतक्षात वाटला का नाही याची चौकशी झाली पाहिजे.
आता पाच महिने झाले पाचवी ते आठवी शाळा सुरू आहे. परंतु त्यांना पाच महिन्यापासून पोषण आहार मिळत नाही. अधिकारी सांगतात की ठेकेदारांची मुदत नोंहेबरला संपली.
मग नोंहेबरला वाहतुकीच्या ठेकेदारांची मुदत संपणार होती, मग त्याचे नियोजन आधीच का केले नाही. नियमाने एक दिवस सुद्धा एकही विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित ठेवता येत नाही मग आता पाच महिन्या पासून वंचित राहिले,
याला जबाबदार कोण व त्यांच्यावर काय कारवाई करणार? गोरगरीबांच्या मुलांसाठी आलेला पोषण आहाराचा तांदूळ १०७ मेट्रिक टन गोदामात पडून आहे.
तो आता सडून जाईल, खराब होईल याला जबाबदार कोण.आपण म्हणतो अन्न हे पूर्ण ब्रम्ह मग याची अशीच नासाडी होऊन द्यायची का? त्यामुळे तातडीने पोषण आहार मुलांना मिळेल असे नियोजन अधिकारी,पदाधिकाऱ्यांनी करावे व नेहमीप्रमाणे न वाटलेल्या पोषण आहाराची बिले निघणार नाही याची काळजी घ्यावी.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|