अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-गेल्या काही महिन्यांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे. यामुळे शिक्षण व्यवस्थेमध्ये मोठे बदल करण्यात आले. यातच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
त्यांनतर राज्यातील आता ५वी ते ८वी शिष्यवृत्ती परिक्षा पुढे ढकलल्या असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. राज्यातील कोरोना परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा लक्षात घेता 23 मे ला होणारी शिष्यवृत्ती परीक्षा आता लांबणीवर टाकण्यात येत आहे.

लवकरच या परिक्षेसाठी नवी तारीख जाहीर केली जाईल असे देखील म्हटलं आहे. शिक्षणमंत्र्यांचे ट्विट… राज्यातील कोरोना विषाणूची परिस्थिती पाहता,
महाराष्ट्र राज्य परीक्षेची पूर्व-उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इयत्ता आठवी) परीक्षा पुढील नोटीसपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे, असे ट्विट शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
यंदा राज्यभरातून शिष्यवृत्ती परीक्षेकरिता एकूण47,662 शाळांनी नोंदणी केली आहे. इयत्ता 5 वीचे 3,88,335 तसेच इयत्ता 8 वीचे 2,44,143 असे एकूण 6,32,478 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. पण कोविड मुळे आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|













