विश्वजीत लेका मानलं…! माळरानावर फुलवला स्ट्रॉबेरीचा मळा ; शेतीमधला हा प्रयोग मोठा आगळावेगळा, लाखोंच्या कमाईचा लागला लळा

Ajay Patil
Published:

Success Story : राज्यात अलीकडे एक म्हण नव्याने प्रचलित झाली आहे ती म्हणजे वावर है तो पॉवर है. म्हणजेच शेती शिवाय पर्याय नाही असा या म्हणीचा अर्थ. मात्र, हे खरंचं आहे हे दाखवल आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर या तालुक्याच्या एका प्रयोगशील शेतकऱ्याने.

तालुक्यातील मौजे गंधोरा येथील एका तरुण शेतकऱ्याने चक्क माळरानावर स्ट्रॉबेरीचा मळा फुलवला असून स्ट्रॉबेरी लागवड यशस्वी करून दाखवत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. विश्वजीत भोसले असं या नवयुवक तरुणाचे नाव. या तरुणाने माळरानावर फुलवलेली ही स्ट्रॉबेरीची बाग सध्या इतर शेतकऱ्यांसाठी कौतुकाचा विषय ठरत असून सध्या विश्वजीत दादांची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

विश्वजीत यांनी आपल्या बारा गुंठे शेत जमिनीवर स्ट्रॉबेरी ची लागवड केली आहे. खरं पाहता परिसरात हा प्रयोग नवखा आहे. विश्वजीतला देखील या शेतीबाबत काहीच माहिती नव्हती यामुळे त्यांनी पाचगणी गाठलं आणि या स्ट्रॉबेरी शेतीमधील सर्व बारकावे शिकून घेण्याचा प्रयत्न केला आणि अगदी एखाद्या अनुभवी माणसाप्रमाणे त्यांनी स्ट्रॉबेरी शेतीतले बारकावे समजले आणि आपल्या गावी परतत स्ट्रॉबेरीची बारा गुंठे शेतजमिनीवर लागवड केली. स्ट्रॉबेरीची रोपे पाचगणीतुनचं मागवली.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

त्यांनी विंटर जातीची रोपे लावली आहेत. बारा गुंठ्यात जवळपास चार हजार स्ट्रॉबेरी रोपे लावण्यात आली. विशेष म्हणजे किडनियंत्रणासाठी त्यांनी सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केला आहे. यामुळे सध्यास्थितीत त्यांनी लागवड केलेली स्ट्रॉबेरी टवटवीत असून आता उत्पादन काढणे चालू असून विक्रमी उत्पादन त्यांना गावल आहे.

स्ट्रॉबेरी लागवडीसाठी त्यांना 60 हजाराचा खर्च आला असून यातून त्यांना जवळपास साडेचार लाखांची कमाई होण्याची आशा आहे. निश्चितच विश्वजीत दादांचा हा प्रयोग इतरांसाठी प्रेरक असा ठरणार असून अवघ्या बारा गुंठ्यात चार लाखांची कमाई म्हणजेच हा एक रेकॉर्डच राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe