अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-जामखेड ग्रामीण रुग्णालय आरोग्य सुविधा पुरविण्यात अपूरे पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच तालुक्यातील जनता व लोकप्रतिनिधीच्या मागणी नुसार पाठपुरावा करत
आ. रोहित पवार यांनी विशेष बाब म्हणून जामखेड ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रूग्णालयात श्रेणीवर्धन करण्यात यश मिळविले आहे.
आता हे रुग्णालय ३० खाटांनरून १०० खाटांचे होणार असून येथे जिल्हा रूग्णालयात देणात येणाऱ्या सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत. दरम्यान जामखेडला तीस बेडची क्षमता असलेले, तालुका ग्रामीण रुग्णालय सध्या कार्यन्वित आहे,
जिल्हा रुग्णालय ते तालुका रुग्णालय हे अंतर जास्त असल्या करणाने, त्यास वाढत्या वैद्यकीय सेवा देण्यात मर्यादा येत होत्या, तालुक्याच्या व शहराच्या वाढत्या आरोग्य विषयक गरजा लक्षात घेऊन गेल्या काही वर्षां पासून बेडची संख्या वाढवावी ही मागणी, जनतेकडून होत होती.
ही प्रमुख बाब लक्षात घेऊन विद्यमान कार्यसम्राट आमदार, रोहित पवार यांनी, पाठपुरावा करून, आरोग्य सेवा आयुक्तालयाकडून, शंभर बेडचे उपजिल्हारूग्णालय मंजूर करून घेतलेले पत्र, आज रोजी प्रकाशित केले आहे, जागा अधिग्रहीत करने बांधकाम करणे व पदनिर्मिती करणे याबाबत स्वतंत्र कार्यवाही करण्यात येईल असेही वर्तीवले आहे.
रुग्णांना तात्काळ सेवा मिळावी म्हणून, रुग्णाचे नातेवाईक रुग्णांना स्थानिक खाजगी रुग्णालयात ऍडमिट करत होते. खाजगी दवाखाने, रुग्णाकडून लाखोंचे बिल घेऊन सामान्य जनतेची आर्थिक हेळसांड करताना दिसतात,
या सर्व आरोग्य गरजा पाहता, स्थानिक आमदार रोहित पवार यांच्या कडून घेतलेला हा निर्णय सर्वसामान्य जनतेला खूप आशादायक ठरलेला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|