अशी वेळ कुणावर येऊ नये : रुग्णालयात घेतल नाही म्हणून पत्नीकडून पतीला तोंडातून ऑक्सिजन !

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातले आहे. ऑक्सीनअभावी अनेक रुग्णांचा मृत्यू होत आहे. कोरोनाचे महाभयानक वास्तव समोर आणणारी धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या आगरा जिल्ह्यात घडली आहे.

रुग्णालयात बेड मिळत नसल्याने आपल्या पतीला घेऊन अनेक हॉस्पीटलमध्ये फिरणाऱ्या एका महिलेने पतीला तोंडातून ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचे पती वाचले नाहीत. या घटनेमुळे सारा देश हळहळला आहे.

रवी सिंघल(वय ४७ वर्षे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या पत्नी रेनू सिंघल यांनी त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. रेनू आपल्या पतीला रिक्षातून दोन-तीन रुग्णालयांमध्ये दाखल करण्यासाठी घेऊन गेल्या.

मात्र, ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याने रुग्णालय प्रशासनाने दाखल करुन घेण्यास नकार दिला. त्यामुळे रेनू आपल्या पतीला रिक्षाने दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जात होत्या.

पण, या दरम्यान त्यांचे पती रवी यांनी जीव सोडला. रेनू यांनी पतीला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. रवी यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने पत्नी रेनूने तोंडाने ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला. पण सगळे प्रयत्न व्यर्थ ठरले.

तीन ठिकाणी ऑक्सिजन बेड उपलब्ध न झाल्याने रेनू आपल्या पतीला घेऊन एसएन मेडिकल कॉलेज येथे पोहोचल्या. पण तिथल्या डॉक्टरांनी तपासल्यानंतर रवी यांनी मृत घोषित केले.

देशात रुग्णांसाठी बेड, ऑक्सिजन बेड मिळणं कठीण होऊन बसलं आहे. महाराष्ट्र पाठोपाठ उत्तर प्रदेश, राजधानी दिल्लीतही भयावह परिस्थिती आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|