अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- मुस्लिम बाधवांंमध्ये पवित्र मानला जाणारा रमजान महिना नुकताच संपला. या महिन्यात रोजे ठेवले जातात. या काळात दान (जकात) करावे, असेही या धर्मात सांगितले आहे.
आपल्या एकूण उत्पन्नातील काही भाग दान द्यायचे असते. याच उद्देशाने जामखेड तालुक्यातील जवळा येथील अंगणवाडी सेविका मीनाताई मुसा शेख यांनी आपला एक महिन्याचा पगार जामखेडमधील डॉ. आरोळे कोविड केअर सेंटरला देणगी म्हणून दिला.
अंगणवाडी सेविकांना तुटपुंजे मानधन मिळते. अशा तुटपुंज्या मानधनावर गुजरण करताना दान करण्याचा कोणी विचारही करू शकत नाही. मात्र, मीनाताई शेख या त्याला अपवाद ठरल्या आहेत. त कोरोना रुग्णांसाठी मोफत सेवा देणारी कोविड केअर सेंटर सुरू झाली.
मात्र, ही सेंटर दानशुरांच्या मदतीने चालवली जातात. उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी यांच्याकडून मदत मिळणे स्वाभाविक आहे. काही ठिकाणी शिक्षकांनी पुढाकार घेऊन कोविड सेंटर उभारली आहेत.
मात्र, तुटपुंज्या पगारात स्वत:चा संसार चालवणे कठीण असलेल्या अंगणवाडी सेविकेने आपला महिन्याचा पगार कोविड सेंटरला दान करणे ही वेगळी गोष्ट ठरते. राज्य सरकारकडे कोरोनासंबंधी उपाययोजनांसाठी निधीची कमतरता आहे.
त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांनी एक दिवसाचा पगार द्यावा, असे आवाहन करण्यात आले. त्यालाही अनेकांनी विरोध केला. काहींनी हा विरोध केला. अंगणवाडीसेविकेपेक्षा जास्त पगार असलेल्या या कर्मचाऱ्यांपैकी अनेक जण एक दिवसाचा पगार देण्यास खळखळ करीत आहेत.
येथे मीना शेख यांनी संपूर्ण महिन्याचा पगारच कोविड सेंटरला दिला. मुळात अंगणवाडी सेविकांना पाच ते आठ हजार रुपये मानधन मिळते. तुलनेत हे दान अल्प आहे. मात्र, शेख यांच्या दृष्टीने महिन्याचा पगार म्हणून त्याची किंमत मोठी आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम