विवाहितेची गळफास घेऊनआत्महत्या !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- कुटुंबातील सदस्याची संख्या जास्त असल्याने खूप जास्त काम पडते त्यामुळे पतीला वेगळं सुचवलं मात्र पती कुटुंबीयापासून वेगळं राहत नाही, आणि मला काम होत नाही म्हणून मी आत्महत्या करीत आहे.

यात पतीचा काहीही संबंध नाही अशी चिठ्ठी लिहून एका विवाहितेने बेडरूममध्ये गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

पपिता राहुल वानखेडे (वय २४ रा.साई कॉलनी शिवाजीनगर वाळूज ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत सविस्तर असे की, पपिता हिने सोमवारी सकाळी चार वाजता सासरा,दिर,पतीला डब्बा करून दिला.

सासू, नणंद दहा महिन्यांच्या मुलीला झोपी घालत होत्या. बराच वेळ होऊनही पपिता हिचा प्रतिसाद न आल्याने त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला असता पपीता गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.

यावेळी तिला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

याप्रकरणी वाळूज ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोरख चव्हाण, मनीषा केदार पुढील तपास करत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe