विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या! ‘या’ तालुक्यातील घटना

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:-  श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील इंदिरानगर परिसरात राहात असलेल्या विवाहित महिलेने पंख्याच्या हुकला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. सारीका नवनाथ धनवटे (वय २१ वर्षे) या विवाहित महिलेने काल दुपारच्या वेळी घरी कोणीही नसताना राहात्या घरी सिलिंग फॅनच्या हुकला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.

सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास या महिलेचे पती नवनाथ धनवटे घरी आल्यावर त्यांना पत्नीने आत्महत्या केल्याचे दिसून आले. याबाबत श्रीरामपूर तालूका पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली.

माहिती मिळताच हेड कॉन्स्टेबल अय्युब शेख यांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह श्रीरामपूर येथे शवविच्छेदनासाठी पाठविला.

या महिलेचे एका वर्षापूर्वी लग्न झालेले होते. या तालुक्यात दिवसेंदिवस दिवस खून, दरोडे, अपहरण यासारख्या घटना वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणूस प्रचंड दहशती खाली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe