अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- कोरोना आजाराला कंटाळून कोविड केअर सेंटरमध्ये गळफास घेऊन करोनाबाधित रुग्णाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
दरम्यान ही धक्कादायक घटना नेवासा तालुक्यातील भेंडा येथील उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये घडली.
गणेश करांडे (वय 35 वर्ष, रा.नेवासा खुद्द,ता. नेवासा) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. बुधवार (21 एप्रिल) रोजी त्याने कोविड सेंटरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी,
वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश साळुंके, पोलीस निरीक्षक विजय करे, सहायक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर, उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे हे घटनास्थळी दाखल झाले.
पंचनामा करून मृतदेहाचे नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून नेवासा खुर्द येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान मयत गणेश करांडे याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|