सुजय विखे म्हणाले… तर आम्ही विकासाच्या मुद्द्यावर कोणासोबतही जाऊ शकतो

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- नगरच्या महापौरपदाच्या निवडणुकीची चर्चा सध्या रंगू लागली आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची युती झाल्याचे बोलले जात आहे.

यातच भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले आमच्याकडे महापौरपदासाठी उमेदवार नसला तरी वरिष्ठांनी निर्णय घेतला तर आम्ही विकासाच्या मुद्द्यावर कोणासोबतही जाऊ शकतो, असे म्हणत विखे यांनी नव्या समीकराणांचीही शक्यता व्यक्त केली.

दरम्यान यंदाच्या महापौर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांचे मनोमिलन झाले आहे. दरम्यान यंदाचे महापौरपदासाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारच नसल्याने भाजप या निवडणुकीतून बाहेर पडल्याने शिवसेना व राष्ट्रवादीला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही.

तर दुसरीकडे शिवसेना व भाजप पुन्हा एकत्र येण्याचा पर्यायही खुला झाला आहे. दरम्यान सध्या राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने भाजपचे बाबासाहेब वाकळे महापौर आहेत. त्यांची मुदत ३० जूनला संपत आहे.

त्याच दिवशी महापौरपदाची निवडणूक होणार आहे. महापौरपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे. या प्रवर्गातील उमेदवार भाजपकडे नाही. त्यामुळे या पदावर आमचा दावा असू शकत नाही.

आमच्याकडे उमेदवार नसल्याने आम्ही विरोधी पक्षात राहणार आहोत, ही आजची परिस्थिती आहे. मात्र, नगरचा इतिहास पाहता,

निवडणूक होईपर्यंत पुढचे आत्ताच काही सांगता येत नाही.’असे असले तरी यासाठी कोणासोबत जायचे, याचा वरिष्ठ पातळीवर निर्णय होऊ शकतो. असेही विखे म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe