अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी मागील काही महिन्यांपासून ‘टू प्लस’चा उपक्रम हाती घेतला या उपक्रमांतर्गत नगर पोलिसांनी राज्यात अव्वल क्रमांक मिळवला आहे.
‘टू प्लस’ उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या कार्यवाहीबाबत पोलिस अधीक्षक पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके उपस्थित होते.

गुन्हेगारी रोखण्यासाठी राज्यभर ‘टू प्लस’हा उपक्रम पोलिस विभागामार्फत राबवण्यात येत आहे हा उपक्रम राबवणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातील पोलिसांचे गुणांकन करण्यात येत आहे. त्यात नगर जिल्ह्याने अव्वल क्रमांक पटकावला.
गुन्ह्यांचा तपास गुन्ह्यांचे दोषारोपपत्र आरोपींचा शोध पुराव्यांचे संकलन याकडे नगर पोलिसांनी अधिक लक्ष देत हा अव्वल क्रमांक मिळवला आहे. ‘टू प्लस’ उपक्रमांतर्गत संबंधित गुन्हेगारांची माहिती संकलित करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचा पोलिस अधीक्षक पाटील व अपर अधीक्षक अग्रवाल यांनी सत्कार केला.
आर. डी. बावकर, एस. एस. जोशी, एस. एस. गोलवड, के.पी. काळे, दुबे एस. य., भागवत टी. एल., दराडे आदी कर्मचाऱ्यांचा गौरव केला. या कर्मचाऱ्यांबरोबरच सर्व उपविभागीय कार्यालयातील कर्मचारी,
पोलिस ठाणे यांच्या प्रयत्नांमुळेच नगर जिल्ह्याला हा मान मिळाला असल्याचे यावेळी पाटील यांनी स्पष्ट केले.गुन्हेगारांची माहिती संकलित करणाऱ्यांचा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी गौरव केला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













