अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने संगमनेर पोलिसांची वाहतूक शाखा बरखास्त करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर असे की, संगमनेर शहरात काही दिवसांपूर्वी वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी वाहतूक शाखा स्थापन करून त्या शाखेत १८ पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती.
हे कर्मचारी वाहतूकीवर लक्ष ठेवत होते. मात्र सध्या संगमनेर शहरात वाहतुकीचा प्रश्न गंभीर नसल्याने ही वाहतूक शाखाच बरखास्त करण्याचा आदेश जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिला.
त्यानुसार आता या वाहतूक शाखेतील त्या सर्व कर्मचाऱ्यांची संगमनेर शहर पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस ठाण्यात दैनंदिन कामकाज आता या कर्मचाऱ्यांना करावे लागणार आहे. तसेच वाहतूक शाखेचे वाहन देखील शहर पोलिस ठाण्याला देण्यात आले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम