सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला, लोकांच्या हितासाठी लॉकडाऊनचा विचार करा…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण येत आहे. अशा परिस्थितीत कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेवर

नियंत्रण मिळवण्यासाठी व लोकांच्या हितासाठी लॉकडाऊन लावण्यावर विचार करावा, असा सल्ला सल्ला सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिला आहे.

रविवारी पार पडलेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा सल्ला दिला. या सुनावणीत न्यायालयाने म्हटले आहे की, आम्ही केंद्र आणि राज्य सरकारांना सामूहिक कार्यक्रम आणि सुपर स्प्रेडर कार्यक्रमांवर बंदी घालण्यासाठी रोख लावण्यावर विचार करण्यास सांगू.

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेची परिस्थिती गंभीर होत असल्याचे पाहून सर्वोच्च न्यायालयाने स्वत: या प्रकरणाची दखल घेतली.

तसंच एखाद्या रुग्णाला स्थानिक पत्ता प्रमाणपत्र किंवा राज्य / केंद्रशासित प्रदेशाचे आयडी प्रुफ नसल्यासदेखील त्या व्यक्तीला रुग्णालयात भरती करणे आणि आवश्यक औषधे देण्यासारखे नाकारले जाऊ शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं.

केंद्र सरकारनं दोन आठवड्यांत या संदर्भात रुग्णालयात दाखल करण्याबाबत एक राष्ट्रीय धोरण आणलं पाहिजं. या धोरणाचा सर्व राज्य सरकारने विचार केला पाहिजे, असं न्यायालयानं म्हटलं.

हे धोरण तयार होईपर्यंत कोणत्याही रूग्णाला स्थानिक अ‍ॅड्रेस प्रुफ किंवा आयडी प्रुफशिवाय रुग्णालयात दाखल करण्यापासून रोखू शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं दिल्लीतील ऑक्सिजन पुरवठ्यावरूनही निर्देश दिले.

दिल्लीतील ऑक्सिजन पुरवठा ठीक करण्यात यावा. तसंच केंद्र सरकारनं ऑक्सिजन पुरवठ्याच्या व्यवस्थेसाठी राज्य सरकारांशी चर्चा करावी.

आपात्कालिन परिस्थितीत ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी डिसेंट्रलाईज केलं जावं, असंही न्यायालयानं सांगितलं.

कोरोना प्रतिबंधात्मक लस, ऑक्सिजन आणि आवश्यक औषधांच्या किंमती, त्यांची उपलब्धता यावर केंद्र सरकारने पुन्हा विचार करावा, असेही न्यायालयानं म्हटलं आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe