तिळगुळाच्या माध्यमातून विश्वासाचा गोडवा निर्माण होतो’

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- विकासकामाबरोबरच माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी आपली संस्कृती जोपासण्याचे काम केले आहे. सण-उत्सवामध्ये मतदार संघातील जनतेला बरोबर घेऊन सणांचा आनंद द्विगुणित केला आहे. गेली २५ वर्षांपासून दिवाळी-पाडवा व मकर संक्रांतिनिमित्त हळदी- कुंकुवाच्या कार्यक्रमाद्वारे महिलांना एकत्र आणण्याचे काम केले जाते.

यामाध्यमातून विचारांची देवाण-घेवाण होते. तिळगुळाच्या माध्यमातून विश्वासाचा गोडवा निर्माण होतो.  असे प्रतिपादन अलका कर्डिले यांनी केले. बुऱ्हाणनगर येथे राहुरी-नगर-पाथर्डी मतदार संघातील महिला भगिनींचा नुकताच स्नेहमेळावा घेण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी माजी मंत्री कर्डिले म्हणाले की, गेल्या २५ वर्षांपासून दिवाळी-पाडवा फराळ कार्यक्रम कोरोना टाळेबंदीमुळे मर्यादा असल्याने घेता आला नाही. मात्र आता शासन निर्देशानुसार टाळेबंदी शिथिल होत असल्याने मतदारसंघातील माता-भगिनींना मकर संक्रांतिच्या सणात सहभागी करुन घेण्यासाठी आजच्या या हळदी-कुंकू व तिळगुळ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम मी करत असतो.

आज कुठल्याही पदावर नसताना एवढ्या मोठ्या संख्येने माता-भगिनी या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याचे पाहून मला मनस्वी आनंद होत असल्याचे ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe