गोदावरीच्या आवर्तनाचा लाभ घ्यावा; राधाकृष्ण विखे पाटलांनी केले आवाहन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:- गोदावरी डाव्या-उजव्या कालव्याला २१ फेब्रुवारी रोजी शेतीसह पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार असल्­याची माहिती माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

परिसरातील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन याबाबतचा पाठपुरावा त्यांनी जलसंपदा विभागाकडे केला होता. या आवर्तनाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

याबाबत आमदार विखे पाटील यांनी पत्रकात म्हटले, की मागील काही दिवसांपासून सर्वच पिकांना पाण्याची आवश्यकता असल्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांकडून आवर्तनाची मागणी होत होती.

या संदर्भात शेतकऱ्यांनी, फळबाग उत्पादकांनी आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. यासंदर्भात जलसंपदा विभागाच्या आधिकाऱ्यांशी चर्चा करुन कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरलेल्या नियोजनाप्रमाणे आवर्तनाची कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या होत्या.

त्यानुसार २१ फेब्रुवारी रोजी पिण्यासह शेतीसाठी आवर्तन सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. हे आवर्तन २१ फेब्रवारी ते मार्च अखेरपर्यंत सुरु राहणार आहे.

उन्­हाची तिव्रता भासू लागल्­याने पिण्­याच्­या पाण्याची टंचाई भासू नये म्­हणून आधिकाऱ्यांनी योग्य ते नियोजन करुन, या आवर्तनातून पिण्याच्या पाण्­यासाठी गावपातळीवरील साठवण तलाव भरुन देण्यास प्राधान्य देण्याच्या सुचना दिल्या आहेत.

शेवटच्या शेतकऱ्याला पाणी मिळेल अशा पद्धतीने पाण्याचे नियोजन आणि काठकसर करण्याबाबतही अधिकाऱ्यांनी सजग राहाण्यास त्यांना सांगितले असल्याचेही आमदार विखे यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe