अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील दारू पिऊन गावात दहशत निर्माण करणारे व भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी भोकर ग्रामपंचायतीने मासिक ठरावाद्वारे तालुका पोलिसांना केली आहे.
दरम्यान तालुका पोलीस काय कारवाई करणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील भोकर गावात काहीजण दारू पिऊन सकाळपासून संध्याकाळपर्यंत गावात दहशत निर्माण करतात व शिवीगाळ करत फिरतात.
तसेच गावातील वाड्यावस्त्यांवरील शेतकर्यांच्या विहिरीवरील वीजपंप चोरी, केबल स्टार्टर, घरगुती पाण्याचा वीजपंप व मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या भुरट्या चोरांचा व दारू पिऊन गावात दहशतनिर्माण करणार्या दारूड्यांचा बंदोबस्त करावा.
तसेच गावात पोलीस कर्मचार्यांची गस्त वाढविण्याची मागणी नुकतीच ग्रामपंचायतीच्या वतीनं पोलिसांकडे करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीचा ठराव नुकताच तालुका पोलिसांना दिला आहे. आता तालुका पोलिसांकडून होणार्या कारवाईकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम