अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गाचा वेग तीव्र आहे. दररोज वाढणारी रुग्ण संख्या चिंताजनक आहे. गर्दी टाळत मास्कचा वापर करावा. प्रत्येकाने कोरोनाला गांभीर्याने घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केले.
कोरोना पार्श्वभूमीवर फेसबुकच्या माध्यमातून आमदार डॉ. तांबे यांनी शुक्रवारी जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले, मागील वर्षी कोरोना विषाणू राज्यात आला. सर्व काही ठप्प झालं. अनेकांनी जीव गमावला.
शासनाचे कोरोना रोखण्यासाठीचे प्रयत्न निर्णायक होते. मात्र नागरिकांच्या ढिलाईमुळे कोरोनाची दुसरी लाट आली. या लाटेत संसर्गाचा वेग अधिक आहे. तरुण व लहान मुलांना संसर्ग होतो आहे.
नागरिकांनी लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. उपचार घेणे अनिवार्य आहे. विनाकारण बाहेर पडणे टाळा. फिजिकल डिस्टनचे पालन करा. कार्यक्रम, समारंभ सद्यातरी रद्द करा.
प्रोटीनयुक्त आहार घेत, शरीर सदृढ ठेवा. व्यायाम करा. आणि मास्कचा वापर कराच. लस घ्या. लसीमुळे प्रतिकार शक्ती वाढत आहे. लसीकरणाबाबत कोणीही गैरसमज करून घेऊ नका. शासकीय यंत्रणेने लसीकरणाला प्राधान्य द्यावे.
जास्त प्रमाणात लसीकरण होण्यासाठी लक्ष केंद्रित करावे. प्रशासन चांगले काम करत आहे. नागरिकांनी कर्तव्य बजावत स्वतःसह कुटुंबाची काळजी घ्यावी. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव फुफुसापर्यंत गेल्यास संकट ओढवू शकते.
कोरोना शत्रू असून त्याचा मुकाबला करण्यासाठी मास्क वापरलाच पाहिजे. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन प्रत्येकाने करावे. भरलेल्या शाळा, आनंदी वातावरण पुन्हा अनुभवायचे आहे.
समृद्ध आणि प्रगत देशांत सांस्कृतिक वातावरण चांगले करायचे असेल तर कोरोनाला हरवणे प्रत्येकाचे परम कर्तव्य आहे. सर्वांनी एकजुटीने लढून कोरोनावर मात करु, असे आवाहन आमदार डॉ. तांबे यांनी जनतेला केले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|