अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- जनरक्षणाचे कर्त्यव्य बजावणाऱ्या पोलिसांवर संगमनेर येथे झालेला हल्ला हा समाजाच्या संरक्षक भिंतीवर झालेला हल्ला आहे.
ही घटना अतिशय खेदजनक आहे. या घटनेचा जिल्ह्यातील सराफ सुवर्णकार संघटना तीव्र निषेध करत आहे. जिल्ह्यतील व्यापारी वर्ग पोलिस प्रशासनाच्या मागे ठामपणे उभा आहे.
सध्याच्या करोना संकटकाळात पोलिस प्रशासनाला मदत करणं हे सर्व जनतेचे कर्त्यव्य आहे. पोलिसांवर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर तातडीने कडक कारवाई झाली पाहिजे,
अशी मागणी जिल्हा सराफ सुवर्णकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष वर्मा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.
संगमनेर येथे पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत संतोष वर्मा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवून समाजकंटकांवर तातडीने कडक कारवाईची मागणी केली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|