अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-थकीत बिलासाठी महापालिकेच्या मयत महिला कर्मचारी तृृृप्ती राकेश चव्हाण यांचा मृृत्यू अहवाल (डेथ सर्टिफिकेट) देण्यास शहरातील एका नामांकित खासगी रुग्णालयाने नकार दिल्याने मयताचे कुटुंबीय हतबल झाले आहे.
मयत रुग्णाच्या नातेवाईकांची अडवणूक करणार्या शहरातील साई एशियन हाॅस्पिटलविरुध्द कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी केली आहे.
महानगरपालिकेच्या मुख्यालयात पार पडलेल्या बैठकीत लोखंडे यांनी ही मागणी केली. यावेळी बोलताना कामगार युनियनचे अध्यक्ष लोखंडे म्हणाले, साई एशियन हाॅस्पिटलने मयत तप्ती चव्हाण यांच्या नातेवाईकांची जाणीवपूर्वक अडवणूक केली आहे.
बील थकल्याच्या कारणामुळे या दवाखान्याचे अडवणुकीचं धोरण माणुसकीला धरुन नाही. हाॅस्पिटलच्या स्टाफने नातेवाईकांना चव्हाण यांचा मृृृृत्युचा अहवाल अद्यापही दिलेला नाही. त्यामुळे या हाॅस्पिटलचा वैद्यकीय परवाना रद्द करण्यात यावा.
दरम्यान, खासगी रुग्णालयात बिलांसाठी होणार्या अडवणुकीवरुन वैद्यकीय व्यवसायात सेवाभाव राहिला नसून या पवित्र क्षेत्राला धंद्याचं स्वरुप प्राप्त झालं असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.
दरम्यान नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी रुग्णालयांना सूचना केल्या आहेत कि रुग्णांचे बिले हि शासकीय दराप्रमाणे आकारली जावीत. असे न करणाऱ्या रुग्णालयावर कारवाई केली जाईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|