एकीकडून सात लाखाचा हुंडा घेऊन दुसरी सोबतच थाटला संसार…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- परळी येथील एका मुलीच्या बापाकडून सात लाख रुपयांचा हुंडा घेऊन साखरपुडाही पार पडला. मात्र संबंधित फसवणूक करणाऱ्या डॉक्टरने सात लाखाचा होंडा घेऊन दुसऱ्या मुलीसोबत लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी फिर्यादींच्या तक्रारीनुसार वैद्यकीय अधिकाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. डॉ. संदीप वसंतराव मंत्रे असे त्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे.

तो लातूर जिल्ह्यातील साकोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहे.मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार, गेल्यावर्षी 18 सप्टेंबर रोजी संदीप त्यांच्या घरी आला.

मी सध्या वैद्यकीय अधिकारी असून मला लातूरला हॉस्पिटल टाकण्यासाठी सात लाख रुपये द्या.मी तुमच्या मुलीशी लग्न करतो, अशी त्याने मागणी घातली.

मुलगा डॉक्टर असल्याने स्वतःच्या मुलीचे भविष्य चांगले होईल, या आशेने वडिलांनी संदीप सोबत मुलीचे लग्न जमवले. 23 सप्टेंबरला दोन्हीकडील काही मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत साखरपुडा पार पडला.

त्यानंतर 21 ऑक्टोबरला मुलीच्या वडिलांनी ठरल्याप्रमाणे सात लाख रुपये संदीपच्या घरी नेऊन त्याच्या वडिलांकडे सुपूर्द केले आणि लग्न यावर्षी 5 मे रोजी करण्याचे ठरले.

त्यानंतर मुलीच्या वडिलांनी लग्नाची जोरदार तयारी सुरु केली. मंगल कार्यालय बुक झाले, लग्नपत्रिका छापल्या, इतर सर्व साहित्य खरेदी केले. मात्र, संदीपने 23 मार्चपासून त्याचा मोबाईल बंद केला.

अखेर 4 एप्रिलला संदीपने दुसऱ्या मुलीसोबत लग्न झाल्याचे व्हॉट्सॲपवर व्हिडीओ क्लिपमध्ये सांगून या लग्नास नकार दिला.

याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून डॉ. संदीप मंत्रे याच्यावर परळी शहर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला.

केवळ लग्नास नकार देऊन संदीप शांत बसला नाही. माझे लग्न झाल्याचे सांगूनही माझा पाठलाग करण्यात येत आहे, लग्नासाठी माझ्या कुटुंबावर दबाव आणत आहेत,

अशा आरोपांचा व्हिडीओ करून तो नातेवाईकात पाठवून मुलीची आणि तिच्या वडिलांची बदनामी करु लागला, असं फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, संदीपने हुंडा घेतलेल्या मुलीच्या कुटुंबियांना अंधारात ठेऊन दहा वर्षापासून ओळख असलेल्या मुलीसोबत लातूर जिल्ह्यातील रायवाडी येथील मंदिरात लग्न केले.

याच मुलीसोबत लग्न करण्याचे निश्चित असतानाही संदीपने माझ्या मुलीसोबत विवाह करतो म्हणून सात लाख रुपये घेऊन फसवणूक केली, असा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News