अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- शेतीचे वाटणी पत्राआधारे उतर्यावर नोंद करून देण्यासाठी हजार रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या कर्जत तालुक्यातील एका तलाठ्यास रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
नगर लाचलुचपत विभागाच्या पथकाने मिरजगाव येथे ही कारवाई केली. दरम्यान सचिन सुरेश क्षीरसागर (वय 35 रा. मिरजगाव ता. कर्जत) असे लाचखोर कर्मचार्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,
तक्रारदार यांनी त्यांचे घुमरी गावातील वडिलोपार्जित शेतीचे वाटणी पत्र करून त्या आधारे फेरफार नोंद करून उतारा मिळण्याकरीता घुमरी तलाठी यांच्याकडे अर्ज केला होता.
त्याआधारे तलाठी यांच्याकडून फेरफार नोंद करून उतारा मिळून देण्यासाठी तलाठी कार्यालयात मदतनीस म्हणून काम करणारा खाजगी कर्मचारी क्षीरसागर याने तक्रारदार यांच्याकडे एक हजार रूपयांची मागणी केली होती. ही लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने क्षीरसागर याला रंगेहाथ पकडले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|