टार्गेट लाखांचे लसीकरण झाले हजारांचे; नगर शहरातील धक्कादायक परिस्थिती

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :-कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. यातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नगर शहरात आतापर्यंत 4 लाख 20 हजार उद्दिष्टापैकी केवळ 49 हजार 904 लोकांनी करोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. तर कोणताही डोस घेतलेला नाही, अशा नगरकरांची संख्या तब्बल 3 लाख 23 हजार 581 आहे.

करोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत नगर शहरातील करोनाची स्थिती वाईट होती. महापालिका प्रशासन, पोलीस आणि आरोग्य खात्याने केलेल्या उपाययोजनांमुळे करोना संसर्गाची परिस्थिती नियंत्रणात असली तरी लसीकरणाच्या बाबतीत शहरातील स्थिती समाधानकारक नसल्याचे आकडेवारी सांगत आहे.

अलिकडच्या काही महिन्यांपासून नगरकरांना लसीचे महत्व लक्षात आल्यानंतर नागरिक लसीकरणासाठी गर्दी करतांना दिसत आहेत. नगर शहरात महापालिकेने 4 लाख 20 हजार लोकांचे लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. शहरात 96 हजार 419 जणांना करोना लसीचा पहिला डोस देण्यात आलेला आहे.

त्यापैकी 49 हजार 904 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तर 3 लाख 23 हजार 581 नगरकरांनी अद्याप एकही डोस घेतलेला नाही. राज्य सरकारकडून नियमित आणि पुरेशा प्रमाणात लस मिळाल्यास लसीकरणाचा वेग वाढवणे शक्य असल्याचे मनपा आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe