Tata Steel Bonus : तुम्ही टाटा स्टीलचे कर्मचारी (Employees of Tata Steel) असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी (Good News) आहे. कारण टाटा स्टीलने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर (Announced) केला आहे.
टाटा स्टील बोनस करारांतर्गत कर्मचाऱ्यांना यंदा एकूण 317 कोटी रुपयांचा बोनस दिला जाणार आहे. याअंतर्गत कर्मचाऱ्यांना 1 ते 4 लाखांपर्यंत फायदा होणार आहे. टाटा स्टीलच्या एकूण 23,710 कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
विशेष बाब म्हणजे या वर्षी जमशेदपूर युनिट, ट्यूब्स डिव्हिजन, टिस्को ग्रोथ शॉप, माईन्स, कॉलीरीज, कलिंगनगर, जमडोबा, झरिया, वेस्ट बोकारो, एफएएमडी, कोलकाता यासह टाटा स्टीलच्या 23,710 कर्मचाऱ्यांमध्ये 317.51 कोटी रुपये बोनस म्हणून वितरित केले जाणार आहेत.
मागील वर्षीच्या तुलनेत ही रक्कम 47.23 कोटी रुपये अधिक आहे. सूत्राच्या आधारे, व्यवस्थापनाने बोनस कायद्यापेक्षा जास्त रकमेमुळे जास्तीत जास्त 20 टक्के बोनस दिला आहे.
याशिवाय सर्व कर्मचाऱ्यांना 20 हजार रुपये सदिच्छा रक्कम म्हणून देण्यात येणार आहे. ही रक्कम 47.42 कोटी रुपये असेल.गेल्या वर्षी 25,400 कर्मचाऱ्यांना 270.28 कोटी रुपयांचा बोनस मिळाला होता.
यावेळी बोनस आणि सदिच्छा रक्कम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर (Bank) 15 सप्टेंबर रोजी पाठवली जाईल. कमाल 4,58,411 रुपये आणि किमान 116527 रुपये मिळतील.
एनएस ग्रेडमध्ये कमाल बोनस 1 लाख 16 हजार 527 रुपये, एनएस ग्रेडमध्ये किमान बोनस 41 हजार 448 रुपये आणि स्टीलमध्ये कमाल बोनस 4 लाख 58 हजार 441 रुपये आहे, तर सरासरी बोनस 1 लाख 54 हजार 457 रुपये आहे.
टाटा स्टीलच्या जमशेदपूर आणि ट्यूब्स विभागातील 12,213 कर्मचाऱ्यांना यावर्षी 188.64 कोटी रुपयांचा बोनस मिळणार आहे. गेल्या वर्षी 12,558 कर्मचाऱ्यांमध्ये 158.31 कोटी रुपये वितरित करण्यात आले होते.
अशाप्रकारे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कर्मचाऱ्यांना 30.33 कोटी रुपये अधिक बोनस मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना एकूण 47 कोटी 42 लाख रुपयांची रोख भेट मिळेल, ही रक्कम टाटा स्टीलच्या नोआमुंडी, कलिंगनगर इत्यादी सर्व प्लांटमधील कर्मचाऱ्यांना दिली जाईल. या कर्मचाऱ्यांची संख्या 23 हजार 710 इतकी आहे.