अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-दिवसेंदिवस बदलत्या काळानुसार आता शाळेत शिकत असताना विद्यार्थ्यांना शिक्षा करण्याच्या प्रकारात खूप बदल झाला आहे. पूर्वी विद्यार्थ्यांना मारहाण केली जात असे मात्र आता त्याला बंदी घातली आहे.
तरीदेखील राहाता शहरातील एका नामांकित शाळेच्या शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली.त्यात त्या विद्यार्थ्याचा हात फॅक्चर झाल्याची घटना घडल्याने तालुक्यात खळबळ माजली आहेेेे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राहाता शहरातील एका नामांकित शाळेच्या शिक्षकाने क्रूरपणे आपल्याच शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यास अमानुषपणे मारहाण करून त्याचा हात फॅक्चर केला.
याबाबत आईवडील राहाता पोलिस स्टेशनला फिर्याद देण्यास गेले होते परंतु रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved