अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- शिक्षक दांम्पत्यांनी वृक्षरोपणाने लग्नाचा वाढदिवस साजरा केला. जुनी पेन्शन योजना संघर्ष समितीचे राज्य सचिव व माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक महेंद्र हिंगे व सविता कार्ले-हिंगे यांनी वाळूंज (ता. नगर) येथे वृक्षरोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
तर या वृक्षाचा मुलांप्रमाणे सांभाळ करण्याचा संकल्प केला. हिंगे दांम्पत्यांनी लग्नाच्या वाढदिवासानिमित्त इतर खर्चाला फाटा देत वृक्षरोपण अभियान राबविले.
वसुंधरेच्या रक्षणासाठी वृक्षलागवड आणि त्याचे संरक्षण महत्त्वाचे आहे. पर्यावरण संरक्षण हा जीवनाचा अविभाज्य भाग होण्याच्या दृष्टीकोनाने सर्वांनी या चळवळीत योगदान देण्याची गरज आहे. पर्यावरण संवर्धनासाठी झाड हे मुलांप्रमाणे वाढवले पाहिजे.
निसर्गाचा समतोल ढासळल्याने अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. आरोग्यासाठी शुध्द हवा गरजेची असून, कोरोनाच्या काळात नागरिकांना ऑक्सिजनचे महत्त्व समजले.
प्रत्येकाने घराच्या प्रांगणात झाडे लाऊन ते जगविण्याचे आवाहन त्यांनी केले. कु. आरवी हिंगे हिने कवितेतून वृक्षरोपण व संवर्धनाचे महत्त्व विशद केले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम