पगारासाठी शिक्षक भीक मागून करणार आंदोलन

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- पुरोगामी महाराष्ट्रात शिक्षकांवर भीक मागण्याची वेळ आली आहे, असे प्रतीपादन कास्ट्राईब शिक्षक शिक्षकेतर संघटना शहराध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी केले आहे.

१२ अॉगस्टपर्यंत शासनाने मागणीचा विचार केला नाही, तर संघटनेच्या माध्यमातून १७ ऑगस्टला सर्व शासकीय कार्यालय, आमदार, खासदार कार्यालयासमोर उपोषण व भीक मागो आंदोलन करण्यात येईल, अशी माहितीही संघटनेने दिली.

१५ फेब्रुवारीच्या निर्णयानुसार २० टक्के अनुदान प्राप्त शाळांना ४० टक्के अनुदानासाठी काही कागदपत्रे अभावी अपात्र करण्यात आले. या त्रुटी पूर्ततेसाठी प्रस्ताव दिल्यानंतर शाळांचे २० टक्के प्रमाणे वेतन थांबवले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe