तहसीलदार ज्योती देवरे आल्या पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आणि म्हणाल्या…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- आत्महत्येचा इशारा देणाऱ्या पारनेरच्या तहसीलदार आज अहमदनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या होत्या. तहसीलदार संघटनेच्या आंदोलनात त्यांनी भाग घेतला. संघटनेच्या त्या जिल्हाध्यक्ष आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना भेटून त्यांनी मागण्या सादर केल्या.

यावेळी व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत त्यांनी प्रथमच पत्रकरांशी संवाद साधला. ‘मी आता सावरले आहे पण मला होणारा त्रास थांबलेला नाही’, असे नमूद करत त्यांनी यावेळी परत एकदा गंभीर आरोप केले पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे आज कॅमेऱ्यासमोर आल्या व त्यांनी विविध बाबींवर प्रकाश टाकला.

व्हायरल क्लिपबाबतचं सत्य सांगतानाच अण्णा हजारे यांच्या भेटीनंतर चुकीच्या बातम्या पसरवल्या जात असल्याबद्दलही त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. देवरे म्हणाल्या, ‘जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे ती माझीच आहे पण ती मी व्हायरल केलेली नाही.

माझ्या भावाने एका पत्रकार मित्राला दिली आणि मग व्हायरल झाली. क्लिप व्हायरल झाल्यावर अनेकांनी मला धीर दिला आणि मी त्यातून आता सावरले आहे.’वेळ आल्यावर आपलीही विचारशक्ती संपते, याचा मी अनुभव घेतला. माझ्या विरुद्ध पाठविलेल्या अहवालात अनेक तांत्रिक चुका आहेत.

या चौकशी अहवालाला घाबरून मी हे काहीच केलेले नाही पण माझ्यावर जो दबाव आणला जात होतो, जी भीती दाखविली जात होती त्यातून मी नकारात्नक विचार केला. आता त्यातून मी बाहेर पडले पण त्रास थांबलेला नाही.

विरोधकांना अद्यापही पाझर फुटलेला दिसत नाही’, असे सांगताना मी कोणाची नावं घेतली नाही, घेणारही नाही. त्यांनी स्वत:च समजून घ्यावे अशी माझी इच्छा आहे, असे सूचक विधानही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांचे नाव न घेता ज्योती देवरे यांनी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News