अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- टंचाई आढावा बैठकीस पूर्वसूचना असूनही तहसीलदार अर्चना पागीरे या अनुपस्थित राहिल्याने आमदार मोनिका राजळे यांचा पारा चढला.
त्यांनी ही बैठक रद्द करून तहसीलदारांच्या विरोधात जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रार केली आहे. लांबलेल्या पावसाने खरीप हंगाम वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
यासह विविध प्रलंबित कामायाविषयी शेवगाव तालुक्याची आढावा बैठक आयोजित करण्याची सूचना प्रांताधिकारी देवदत्त केकान यांना २ जुलैलाच आमदार मोनिका राजळे यांनी दिल्या होत्या.
याप्रमाणे तहसीलदारांनी दि. ७ जुलै रोजी आढावा बैठक आयोजित करून सर्व विभाग प्रमुखांना पत्राद्वारे सूचित केले, त्यानुसार सर्व विभाग प्रमुख तसेच प्रांताधिकारी देवदत्त केकाण बैठकीस उपस्थित राहिले. आ.राजळे यादेखील दोन दिवसीय अधिवेशनाचे कामकाज संपवून आयोजित आढावा बैठकीसाठी पहाटे मुंबईवरून निघाल्या व बैठकी पूर्वी पोहोचल्या.
मात्र यावेळी तहसीलदार अर्चना पागिरे या अहमदनगरला जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीस गेल्याचे समजले परंतु जिल्हाधिकारी कार्यालयातून माहिती घेतल्यानंतर अशी कोणतीही बैठक आयोजित केली नसल्याचे समजले.
तहसीलदरांचे काम आमदार यांच्या प्रोटोकॉल पेक्षा व तालुक्याच्या प्रश्न पेक्षा महत्वाचे वाटले का अशी शंका त्यांनी उपस्थित करत याबाबतची तक्रार जिल्हाधिकारी,
विभागीय आयुक्त नाशिक विभाग व महसूल मंत्री यांना चौकशी करून योग्य कार्यवाही करण्याचे पत्र त्यांनी यावेळी दिले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम