Telecom Company : पुन्हा व्होडाफोन आयडिया संकटात, कायमची बंद होणार कंपनी? जाणून घ्या सविस्तर

Published on -

Telecom Company : व्होडाफोन आयडिया ही देशातील खासगी टेलिकॉम कंपनी आहे. कंपनीचे अनेक प्लॅन खूप लोकप्रिय आहेत. कंपनीचे प्लॅनही ग्राहकांना परवडतील असे असतात. सर्वच टेलिकॉम कंपन्यांमध्ये सध्या मोठी स्पर्धा सुरु आहे.

जर तुम्ही व्होडाफोन आयडिया या कंपनीचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी बातमी खूप महत्त्वाची आहे. कारण ही कंपनी लवकरच बंद होण्याच्या मार्गावर आहे. काही दिवसांपूर्वी व्होडाफोन आणि आयडिया या दोन टेलिकॉम कंपन्या एकत्र आल्या होत्या.

पुन्हा संकटात सापडली व्होडाफोन आयडिया

याबाबत कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने एका अहवालात असे सांगितले आहे की, जर फी दरात वाढ झाली नाही तर आता कंपनीला आवश्यक गुंतवणूक करता येणार नाही त्यामुळे या कंपनीला 5G सेवा सुरू करता येणार नाही. जर असे झाले तर आता कंपनीच्या ग्राहकांची संख्या खूप कमी होऊ शकते.

भांडवल उभारणीच्या योजना या प्रत्यक्षात आणणे अवघड आहे. रिपोर्टनुसार, जर असे झाले तर पुढे बाजारात फक्त रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल या दोनच कंपन्या शिल्लक राहतील. त्यामुळे आता दीर्घकाळात दोन्ही कंपन्यांची मक्तेदारी (मोनोपॉली) राहण्याची स्थिती निर्माण होण्याची चिंता वर्तवली जात आहे.

महागाई

या ब्रोकरेज कंपनीच्या मतानुसार, टेलिकॉम कंपन्या सार्वत्रिक निवडणुकांनंतरच म्हणजे जून 2024 मध्ये टॅरिफ वाढवू शकते. याचे कारण हे आहे की किरकोळ महागाई RBI च्या समाधानकारक मर्यादेपेक्षा जास्त असणे आणि राज्यांमधील निवडणुका. अहवालानुसार, “टेरिफ दर वाढवण्यास जर आता उशीर झाला तर याचा वाईट परिणाम कंपनीवर होईल आणि त्यामुळे या कंपनीला पुढे बाजारात टिकून राहणे कठीण होईल.

कंपनीला आहे गुंतवणूक वाढवण्याची गरज

व्होडाफोन आयडियाला 4G कव्हरेज वाढवण्यासाठी तसेच 5G सेवा सुरू करण्यासाठी गुंतवणूक वाढवण्याची गरज आहे असे सांगण्यात येत आहे. अहवालात सावधगिरी बाळगताना असे सांगण्यात आले आहे की जर कंपनीने गुंतवणूक केली नाही तर तिचा बाजारातील हिस्सा कमी होईल.

या अहवालानुसार, “आमच्या अंदाजानुसार, कंपनीला पुढील 12 महिन्यांत 5,500 कोटी रुपयांच्या रोख तुटवड्याचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.”दर न वाढवले नाही तर किंवा भांडवल वाढवण्यास उशीर झाला तर कंपनीला कामकाज बंद करावे लागेल.”

ब्रोकरेज कंपनीने व्होडाफोन आयडियाचे रेटिंगही निलंबित केले असून 2.3 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज आणि बाजारातील हिस्सा कमी होण्याची शक्यता पाहता निधी उभारणे कंपनीसाठी अवघड काम आहे असे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News